Tuesday, January 17, 2012

फेसबुकने वाचवले आई-मुलाचे प्राण !


फेसबुकसह अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सच्या दुष्परिणामांची आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या मागणीची चर्चा झडत असतानाच अमेरिकेमधील साल्ट लेक सिटी येथील एका महिलेचे व तिच्या मुलाचे प्राण वाचल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेला (तिने नाव गुप्त ठेवण्याची अट पोलीसांना घातली होती.) व तिच्या मुलाला ट्रॉय क्रिटफिल्ड याने तिच्याच घरात जेरबंद करून ठेवले होते. पाच दिवसांच्या या तिच्या घरातच घडलेल्या सक्तीच्या तुरुंगवासात या महिलेचा जगाशी संपर्क तोडण्यात आला होता. पण तिच्या नशीबाने पाचव्या दिवशी ही महिला क्रिचफिल्डची नजर चुकवून लॅपटॉप टॉयलेटमध्ये घेऊन जाऊ शकली. तिने तिच्या फेसबुकवर मेसेज टाकाल, की उद्या सकाळी मी मरणार आहे.

तिचा हा पोस्ट बघून कुणीतरी पोलीसांना कळवले आणि पोलीसही लगोलग खरी परिस्थिती जाणून घ्यायला तिच्या घरी दाखल झाले. यावेळी क्रिचफिल्डशी त्यांची गाठ पडली आणि या महिलेला पाच दिवस डांबून ठेवण्यात आल्याचे पोलीसांना समजले. ज्या ज्या वेळी या महिलेने घराबाहेर निसटण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी क्रिचफिल्डने तिला अमानुष मारहाण केली व काही वेळा तर तिचा गळाही दाबला. घरातला फोनही त्याने तोडून टाकला आणि बाहेर कुणाशी संपर्क साधण्याची शक्यताही उरली नाही.

पोलीसांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्या महिलेचे नशीब जोरावर होते म्हणून तिला पाचव्या दिवशी टॉयलेटमध्ये का होईना पण लॅपटॉप वापरता आला. लॅपटॉपच्या वापराने फेसबुकवर तिने मरणाची भीती पोस्ट केली आणि त्यामुळेच तिच्या व तिच्या मुलाच्या सुटकेचा मार्गही मोकळा झाला. या पाच दिवसांमध्ये शारीरिक छळाबरोबरच लैंगिक अत्याचारांचाही सामना करावा लागल्याचे या महिलेने सांगितले. तिच्या शरीरावरील जखमा ती खरे बोलत असल्याचे निदर्शक होती असे पोलीसांनी सांगितले.

क्रिचफिल्ड तिच्या मुलाशीही क्रूरपणे वागला आणि त्याने मुलाला त्याच्या कुत्र्याला साधे खायलाही घालू दिले नाही. क्रिचफिल्डला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पळवणे, हल्ला करणे, लैंगिक अत्याचार करणे, लहान मुलाच्या समोर हिंसा करणे, लहान मुलावर अत्याचार करणे आणि संपर्काची साधणे तोडणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. क्रिचफिल्डला पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

ದಾಸಿಮಯ್ಯನ ವಚನ

ಒಡಲುಗೊಂಡವ ಹಸಿವ;  ಒಡಲುಗೊಂಡವ ಹುಸಿವ  ಒಡಲುಗೊಂಡವನೆಂದು  ನೀನೆನ್ನ ಜರಿದೊಮ್ಮೆ ನುಡಿಯದಿರ ನೀನೆನ್ನಂತೆ ಒಮ್ಮೆ ಒಡಲುಗೊಂಡು ನೋಡ ರಾಮನಾಥ.