Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Wednesday, December 04, 2013

ಕೃತಿಚೌರ್ಯ : ನನ್ನ ಅನುಭವ


ಡಾ. ಸಿದ್ರಾಮ ಕಾರಣಿಕ
(ಯುಗಾರಂಭ ಅನುವಾದದ ಬಗೆಗೆ ವಿಚಿತ್ರವಾದ ಕೆಲವು ಸತ್ಯಗಳು)


... ವಿಷಯ ತುಂಬ ಸ್ವಾರಸ್ಯಕರವಾದುದು. ಯಾವುದನ್ನು ನಾನು ನಿರೀಕ್ಷಿಸಿರಲಿಲ್ಲವೋ ಅದೇ ಆಗಿತ್ತು ! ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಡಾ. ವಿನೋದ ಗಾಯಕವಾಡ ಅವರು ಮಹಾತ್ಮಾ ಫುಲೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಕಾದಂಬರಿಯನ್ನು ಬರೆಯುತ್ತಿರುವುದಾಗಿಯೂ ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡಬೇಕೆಂದೂ ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ಅದೂ ಹಸ್ತಪ್ರತಿಯಲ್ಲೇ ಇರುವ ಕೃತಿ. ನಾನೂ ಒಪ್ಪಿಕೊಂಡೆ. ಹದಿನೈದು ದಿನ ನಿರಂತರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ. 27ನೇ ಮಾರ್ಚ್ 2008 ರಂದು ಅನುವಾದವನ್ನೂ ಮಾಡಿ, ಡಿಟಿಪಿಯನ್ನೂ ಮಾಡಿ ಪ್ರಕಟಣೆಗೆ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿದೆ. ಎರಡು ಸಿ.ಡಿ.ಗಳಲ್ಲಿ ರೈಟ್ ಮಾಡಿ ಡಾ. ಗಾಯಕವಾಡ ಅವರಿಗೂ ನೀಡಿದೆ. ಅವರು ಅವುಗಳನ್ನು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಪ್ರಕಟಣೆಗೆಂದು ಕಳುಹಿಸಿ ಕೊಟ್ಟೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಬಹು ದಿನಗಳಾದರೂ ಪುಸ್ತಕ ಪ್ರಕಟವಾಗಲಿಲ್ಲ. ಆಗ ಮತ್ತೇ ನಾನು ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಡಾ. ಗಾಯಕವಾಡ ಅವರನ್ನು ಕೇಳುತ್ತಲೇ ಇದ್ದೆ. ಕೊನೆಗೂ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಏನೆಂದರೆ ಪ್ರಕಟಣೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೊತ್ತ ವ್ಯಕ್ತಿ ನುಣುಚಿಕೊಂಡರಂತೆ !
ಆಮೇಲೆ ನಾನೂ ಸುಮ್ಮನಾದೆ. ಆದರೆ ಈ ವರ್ಷ ಅಂದರೆ ನಾನು ಅನುವಾದ ಮಾಡಿದ ಎರಡು ವರ್ಷಗಳ ನಂತರ ನನಗೆ ಒಂದು ಆಘಾತದ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಯಿತು. ಮಹಾತ್ಮಾ ಫುಲೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಬೆಂಗಳೂರಿನ ಮಹನೀಯರೊಬ್ಬರು ಕೃತಿಯನ್ನು ರಚಿಸಿ, ಪ್ರಕಟಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಓದಿದೆ. ಯಾಕೋ ಸಂಶಯ ! ಓದುತ್ತ ಹೋದಂತೆ ನನ್ನ ಸಂಶಯ ಬಲಗೊಂಡಿತು. ಹೌದು. ಆ ಕೃತಿ ನನ್ನ ಅನುವಾದದ ಮಾದರಿಯಲ್ಲೇ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಬರುವ ಸಂಭಾಷಣೆಗಳು ನಾನೇ ಬರೆದವುಗಳು ಎಂಬುದು ನನಗೆ ದೃಢವಾಯಿತು ! ಯಾಕೆಂದರೆ ನನ್ನ ಶೈಲಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗುವುದಿಲ್ಲವೇ ? ಅನುವಾದವಾದರೂ ನಾನು ಬಳಸುವ ಶಬ್ದಗಳು, ನುಡಿಗಟ್ಟುಗಳು ಭಿನ್ನವೇ ಆಗಿರುತ್ತವೆ. ಅನುವಾದ ಎನ್ನುವುದಕ್ಕಿಂತಲೂ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ವಿವರಗಳನ್ನೂ ನಾನು ಬಳಸಿಕೊಂಡಿರುತ್ತೇನೆ. ಇದನ್ನು ಹಲವರಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದೆ. ಯಾವುದೋ ಗುಮಾನಿಯಿಂದ ಮೂಲ ಲೇಖಕರನ್ನೂ ಸಂಪರ್ಕಸಿದೆ. ಅವರೂ ತಮಗೇನೂ ತಿಳಿದಿಲ್ಲ ಎಂದರು. ಕೃತಿಚೌರ್ಯ ನಡೆದಿರುವುದಂತೂ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಅದನ್ನೇ ದೊಡ್ಡದನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ವಿಚಾರ ನನ್ನದಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ರೂಪ ಪ್ರಕಾಶನದ ಆತ್ಮೀಯ ಮಹೇಶ ಅವರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿದೆ. ಅವರು ಕೃತಿಯನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಲು ಮುಂದೆ ಬಂದರು. 
ಇದನ್ನು ಯಾಕೆ ಹೇಳುತ್ತಿದ್ದೇನೆ ಎಂದರೆ ಕೃತಿಚೌರ್ಯ ಮಾಡುವವರು ಹೇಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದನ್ನು ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆಂದು ಎಂದರೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾದೀತು ! ಯಥಾವತ್ತ ನಕಲು ಮಾಡದೇ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಕೆಲ ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ, ಯಾರದೋ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಇನ್ನ್ಯಾರೋ ತಮ್ಮ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಸುವುದು ಮತ್ತು ಹೆಸರು ಮಾಡುವುದು ಎಷ್ಟು ಸರಿ. ಈ ಬಗ್ಗೆ ಯಾರೇ ಬಂದರೂ ಮುಖಾಮುಖಿ ಉತ್ತರ ನೀಡಲೂ ನಾನು ಸಿದ್ಧನಾಗಿಯೇ ಇದ್ದೇನೆ. ಆದರೂ ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಈ ಕಾದಂಬರಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೆಯದು ಎಂದು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲು ಇಚ್ಚೆ ಪಡುತ್ತೇನೆ.

Monday, November 04, 2013

|| बळीराजा ||

-महात्मा जोतीराव फुले

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||


Sunday, September 15, 2013

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौध्द सोडून इतर दलितांनी स्वीकारले आहे का..?


निलेश ठेगे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आघाडयांवरून संघर्ष केला. प्रचंड लिखाण केले. वारंवार भारतात आलेल्या कमिशनना निवेदने सादर केली. अस्पृश्यांना अन्यायाच्या विरोधी लढा देण्यासाठी तयार केले. साऊथबरो कमिटी, सायमन कमिशन, गोलमेज परिषदांना त्यांनी सादर केलेली निवेदने जर बघितली तर अस्पृश्यांच्या सबळीकरणासाठी विकासासाठी त्यांची बांधीलकी तळमळ लक्षात येते. अस्पृश्यांना डिप्रेसड वर्गाना गुलामीच्या लाचारीच्या गर्तेतून बाहेर काढून अन्यायाविरुध्द लढाईस तयार करणे हे त्यांच्या लढयाचे मुख्य उद्दिष्ट होते. सामाजिक स्वातंत्र्य आणि राजकीय सबळीकरण विकास या तीन बाबी मागासलेल्या समुहांना मिळाल्या पाहीजेत यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. 

अनु.जाती, जमाती, गरीब,अल्पसंख्यांक महिलांच्या सर्वसमावेशक विकासासाठी बाबासाहेबांनी १९१९ ते १९५४ दरम्यान वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन जातीच्या आधारावरून होत असलेल्या भेदभावावर तोडगा काढण्यात यावा असे सुचविले. मे १९२८ ला सायमन कमिशनला दोन निवेदने दिली. गोलमेज परिषदेत दोन १९३०-१९३२ अस्पृश्यांच्या मागण्यासंबंधी अभ्यासपूर्ण निवेदने दिली. १९४० च्या दरम्यान आजच्या आरक्षण धोरणाचा आधार डॉ. आंबेडकरांनी तयार केला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आरक्षण धोरणाला मूर्त स्वरुप प्राप्त झाले. बाबासाहेबांनी भारत देशाची जलनीती ( water policy ) नौकानयन विकासाचे सर्वसमावेशक प्रारुप ( inclusive development model ) मांडले ते राबविले. भारताच्या लोकसंख्या धोरणविषयीचे विचार १९३७ ला मांडले वाढत्या लोकसंख्येची समस्या हाताळण्यासाठी उपाय योजना सूचविल्या. ते देशाच्या सर्वसमावेशक विकासाचे शिल्पकार होते. अशी 'व्हिजन'आणि 'सर्वस्पर्शी परिप्रेक्ष्य' असतानाही त्यांना देशातील सर्व जनतेने स्विकारले का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. 

भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे एवं पिछडे वर्गोंके मसीहा याच विचाराने लोक त्यांना संबोधतात. महाराष्ट्रात ५९ अनु जाती आहेत. त्यातील प्रमुख जाती म्हणजे महार (नवबौध्द) मातंग, चांभार, ढोर आणि होलर या आहेत. बौध्द वगळता इतर चार जातीनी बाबासाहेबांना सामुदायीक पातळीवरुन मान्य केले का? याचे उत्तर दुदैवाने नकारार्थी आहे. पण त्याची कारणे आपण समजून घ्यायला हवीत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांची मंडळी तीन विशिष्ट प्रकारे आठवण काढतात. ) सरकारी-दरबारी त्यांची आठवण निघते. भारतीय घटनेचे ते शिल्पकार होते. दलितांचे कैवारी उध्दारकर्ते होते अशी बोळवण केली जाते. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार भारतीय समाजाची पुनर्बाधणी करण्यासाठीचे त्यांचे योगदान याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते. त्यांना victim of reductionism केले जाते. हे दलितेत्तर मंडळीकडून होते हे वेगळे सांगायला नको. बाबासाहेबंची जयंती साजरी करणे म्हणजे एक ritual चा भाग झाला आहे. ) डावे-उजवे, भगवे या राजकीय पक्षांना बाबासाहेबांच्या विचारप्रणालीची ' Allergy ' झाली आहे. डावे पक्ष बाबासाहेबांना Caste leader म्हणूनच संबोधतात. उजव्या पक्षांनी डॉ. आंबेडकरांना हिंदुत्वाच्या माहोलमध्ये Co-opt करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाचे राजकारण केलं गेलं. राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या विचारांची थट्टा केली गेली. ) तिस-या प्रकारात बाबासाहेबांची आठवण काढणारी दलित मंडळी आहेत. बाबासाहेबांना ते ' Symbol of revolt ' म्हणूनच स्वीकारतात. देशपातळीवर दलित जनतेनी त्यांना स्विकारले आहे. ही जनता आंबेडकरांच्या योगदानाचा, सिध्दांताचा विचारांचा वापर करतात. त्यांच्या छोटया मोठया प्रश्नांची तड लावण्यासाठी आंबेडकरी प्रेरणा हीच त्यांची शक्ती आहे. खऱ्या अर्थाने ही सामान्य जनता बाबासाहेबांची अनुयाची आहे. बाकीच्या अनुयायांविषयी बोललेलच बरं

महाराष्ट्रातील बौध्देत्तर दलितांनी बाबासाहेबांची विचारप्रणाली नेतृत्त्व स्विकारले का? याचे उत्तर 'हो' आणि 'नाही' असेच आहे. डॉ. आंबेडकरांना का स्विकारले नाही? या उत्तरासाठी आपल्याला मातंग, ढोर, चांभार होलर या प्रमुख जातींचे जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये 'स्थान' काय होते हे बघावे लागेल. वरील चार जातींना गावगाडयात पारंपारिक व्यवसाय होता. पारंपारिक कला कुसर हाती असल्याने आर्थिक आधार त्यांना होता. म्हणून 'जात आणि व्यवसाय' यांच्यात सातत्य राहिले. त्यामुळे त्यांचे स्थलांतर mass based वर झाले नाही. या जातींनी 'सांस्कृतिकरणाची' प्रक्रिया अवलंबवीली. या उलट नवबौध्दांनी बाबासाहेबांच्या लढयाला नेतृत्वाला विद्युतगतीने सामुदायीक समुच्चयाने प्रतिसाद दिला. दर्जा वाढविण्यासाठी सांस्कृतीकरणाच्या प्रक्रिये ऐवजी political means वापरले. परिणामी, त्यांच्या सामाजिक गतीशिलतेसाठी, इतर घटकांव्यतिरिक्त, डॉ. बाबासाहोंचा role महत्वाचा घटक राहीला आहे. यावर खूप संशोधन झाले आहे. वरील प्रकारच्या तपशीलात गेल्यास तीन प्रकारच्या images निर्माण झाल्याचे लक्षात येते.महार/नवबौध्दांनी अंगीकारलेली Aggressive strategy ,ढोर-चांभारांची imitative strategy आणि मातंगाची depressive revivalist strategy. बौध्द समुदाय प्रत्येक front वर आक्रमक Aggressive राहिला म्हणून सामाजिक गतीशिलता जास्त प्रमाणात आली.चांभार-मातंग समुदायात सामाजिक गतीशिलता हिंदू समाज व्यवस्थेच्या मुल्य व्यवस्थेच्या आधीन राहूनच आली.

बौध्दांनी डॉ.आंबेडकरांकडे Role Model म्हणूनच बघितले. 'शिका, संघटीत व्हा संघर्ष करा' या घोषणेला भरभरून प्रतिसाद दिला.अनेक संघर्षात त्यानी खूप किमंतही मोजली.पण अन्यायाविरूध्द समुच्चयाने लढण्याची ताकद त्याच्यात निर्माण झाली.आपण अन्यायाविरूध्द लढू शकतो ही मनाची तयारी झाली. हे केवळ आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. ज्या मंडळींनी सामुहीक समुच्चयाने डॉ.आंबेडकरांना स्वीकारले त्यांनी आंबेडकरीचे आज किती वाटे पाडलेत? तरी ते स्वतःला आपण बिनीचे आंबेडकरवादी आहोत असे समजतात ना? बौध्देत्तर दलितांच्या आंबेडकरी निष्ठा पदोपदी तपासण्यासाठी ते परीक्षकाची भूमिका घेतात. हा असा अधिकार त्यांना कसा काय प्राप्त होतो? हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. दुदैव हे आहे की, ना सवर्णानी ना दलित अनुयायांनी बाबासाहेबांना digest केलं. digest केलं नाही तर कृतीकार्यक्रम व्यवहारात कसा आणणार? फक्त ritual म्हणून किंवा भावनात्मक पातळीवर बाबासाहेब स्विकारण्याचे दिवस केव्हाचे संपले आहेत, हे लोकांना का कळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.

From : Prabodhan, marathi Magazine 

ದಾಸಿಮಯ್ಯನ ವಚನ

ಒಡಲುಗೊಂಡವ ಹಸಿವ;  ಒಡಲುಗೊಂಡವ ಹುಸಿವ  ಒಡಲುಗೊಂಡವನೆಂದು  ನೀನೆನ್ನ ಜರಿದೊಮ್ಮೆ ನುಡಿಯದಿರ ನೀನೆನ್ನಂತೆ ಒಮ್ಮೆ ಒಡಲುಗೊಂಡು ನೋಡ ರಾಮನಾಥ.