Thursday, July 12, 2012

भारतीय'...म्हंजी काय रं भौ ?

भारत एकीकडे जगातील महासत्ता होण्याची वाट पाहात असतानाच, देशावर एक मोठं अभूतपूर्व संकट येऊन कोसळतं. देशच नाही, तर अख्खं जग हादरून जातं आणि या सगळ्याला कारणीभूत ठरतं, आडनिड महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेलं भारताच्या नकाशावर ठिपक्याएवढंही नसलेलं एक मागासलेलं गाव.

देश स्वतंत्र झाल्यापासून आजवर या गावात रस्ता, वीज, पाणी, शिक्षण असं काहीही पोचलेलं नाही. थोडक्यात प्रगतीची एकही खूण नाही. प्रगती नाही. याबद्दल कोणाचीही तक्रार नाही, कारण मग कामंही नाहीत. त्यामुळं वेळ भरपूर! तो भरून काढायला स्थानिक राजकारण आहेच! पण एक दिवस गावाला अक्षरशः घबाड सापडतं आणि हे स्थानिक राजकारण पार जागतिक होऊन जातं...

भारतापासून ते संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत सर्वांचं रातोरात अक्षरशः धाबं दणाणतं आणि संपूर्ण जगाचं भवितव्य आडनिड्याच्या हाती येतं...असं म्हणतात, की शहाणपणाला लिमिट असतं पण मूर्खपणाला नाही. संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या या अडाणी आडनिड्याची ही आजवर कधीही न पाहिलेली धम्माल गोष्ट...

एकीकडे ग्लोबल होण्याची स्वप्नं दाखवली जात असताना स्थानिक पातळीवर काहीच बदल घडत नाहीत. जात, पात, धर्म, भाषा आदी कारणांनी अनेकजण आपापलेच हितसंबंध जपायचा प्रयत्न करतात. या स्थानिक आणि 'ग्लोबल'च्या संघर्षातून घडत जाणारी गोष्ट म्हणजेच 'भारतीय'...म्हंजी काय रं भौ???


by- e sakal : Thursday, July 12, 2012

No comments:

Post a Comment

ದಾಸಿಮಯ್ಯನ ವಚನ

ಒಡಲುಗೊಂಡವ ಹಸಿವ;  ಒಡಲುಗೊಂಡವ ಹುಸಿವ  ಒಡಲುಗೊಂಡವನೆಂದು  ನೀನೆನ್ನ ಜರಿದೊಮ್ಮೆ ನುಡಿಯದಿರ ನೀನೆನ್ನಂತೆ ಒಮ್ಮೆ ಒಡಲುಗೊಂಡು ನೋಡ ರಾಮನಾಥ.