फेसबुकवर
रोज नवीन नवीन विचारवंत जन्माला येत आहेत . त्यातले काहीजण असा आव आणत
आहेत कि त्यांनी बुद्ध धम्मावर भरपूर संशोधन केले आहे . पण ते नेहमी
स्वतःच्या सोयीचच लिहिताना दिसत आहेत ..
अश्याच एका विचारवंताने..
''बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार'’ याविषयी त्याच मत मांडताना खालील गोष्टी पब्लिश केल्या आहेत.
तो
म्हणतो ....बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते.
त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही तो
संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो
तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम
म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची
अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री
योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो
आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल."
त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची
स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म
तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट
केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष
झाला.
-------------------------------------------------------------------------------------------------
असो...
बाबासाहेबांनी
बुद्ध धम्मात स्त्रियांचा दर्जा काय, यासंबंधी संशोधन केलेले आहे . ‘भगवान
बुद्ध आणि त्यांचा धम्म ' आणि हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती ' या
शोधग्रंथात विस्तुत विवेचन केले आहे .
त्यातील काही भाग मी इथे पब्लिश करत आहे तरी सगळ्यांनी वाचून प्रतिक्रिया कळवाव्यात हि नम्र विनंती.
बुद्धाच्या
जीवनात आलेल्या प्रमुख ऐंशी स्त्री शिष्यांपैकी ''विशाखा'' एक होती तिला
दानदात्यांची प्रमुख अशी पदवी प्राप्त झालेली होती, आम्रपाली हि गायन व
नृत्य करणारी कलावंतीण पण हीन कुळातील होती . लीच्चविच्या च्या आमंत्रणाला
नकार देऊन आम्रपालीचे निमंत्रण बुद्धाने स्वीकारले . यावरून स्पष्ट होते
कि बुद्ध हीन कुल अथवा स्त्रीभेद मानीत न्हवता . राजा प्रसेनजीत यांची
पत्नी मल्लिका हि बुद्धाची प्रवचने ऐकण्यास वेळोवेळी जात होती .बुद्ध
स्त्रीसंपर्क वर्ज्य समजत न्हवता .स्त्रियाही बुद्ध्च्या सानिध्यात जाण्यास
व राहण्यास अनमान करीत नसत.
बुद्धाने स्त्रियांना संघात
प्रवेश देऊन स्त्री-पुरुष समानतेचे शिक्कामोर्तब केले,महाप्रजापतीच्या
विनंतीला दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही,तो
व्यावहारिक करणानांवर आधारलेला आहे
शेवटी बुद्ध
म्हणाले , 'आनंदा..!' माझा धम्म आणि विनय याचे पालन करून पारीव्र्जज्या
घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गोतामिचा
आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो.पण आठ अटींवर मी ती संमती देतो .
बुद्धाने
संमती दिल्यानंतर महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या
पाचशे शाक्य स्त्रियांनाही त्याचवेळी दीक्षा देण्यात आली . त्यामध्ये
यशोधरा हि आहे .स्त्रियांना ज्ञानार्जनाची अनुज्ञा असावी यासाठी बुद्धाने
सर्वात आधी प्रयत्न केला . ब्राम्हण , क्षत्रिय आणि वैश्य या
त्रेवर्निकानाच ब्राम्हणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती.
आणि त्यापैकी तीही फ़क़्त त्रेवार्निकातील पुरुष वर्गालाच होती . स्त्रिया
या ब्राम्हण क्षत्रिय अथवा वैश्य असोत शुद्र पुरुष असो व स्त्री असो त्या
सर्वाना ज्ञार्जनाचाच काय साक्षरतेचाही अधिकार न्हवता.ब्राम्हणांच्या या
सिद्धान्ताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड पुकारले 'ज्ञानमार्ग , मग तो पुरुष
असो अथवा स्त्री तो सर्वाना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवीत
असत'.
भगवान बुद्धाने गृह्स्थांसाठी जी प्रवचने
दिलेली आहेत , त्यामध्ये 'पुत्रामध्ये कन्या बरी' अश्या शीर्षकाचे एक
प्रकरण ' भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ' या ग्रंथात आले आहे . कोसला
राजाची पत्नी मल्लिका हिला कन्या झाल्याचे ऐकून राजा खिन्न झाला त्यावेळी
भगवंत म्हणाले ,''राजा,कन्या हि पुत्रापेक्षा अधिक चागली निपजण्याचा संभाव
आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या , पत्नी, मत अशा विविध भूमिका करणारी आहे .
तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी होईल, मोठी राज्ये करील.
एवढेच
न्हवे तर बुद्धाने पती-पत्नीसाठी विनय सांगितला आहे ,बुद्ध म्हणतो ''पतीने
आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तिजशी एक्निश्तेने
वागून,तिला सत्ता देऊन,तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी
.कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते . ती सासर माहेरच्या नातलगाचे आदरातिथ्य
करून आपले कर्तव्य बजावते .ती पतिव्र्त्याने वागते ''
एकदा
भगवंत मदुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते तेव्हां
गृहस्थी पती-पत्नी त्यांना भेटले .त्या सर्वांनी बुद्धाला
अभिवादन केल्यानंतर म्हणाले,'' पती-पत्नीतील सुयोग्य संबध कोणता ?'' असा
प्रश्न विचारला . त्यावर भगवंत म्हणाले .''हे गृहस्थहो ,पती पत्नींना चार
प्रकारे एकत्र राहता येते .दुष्ट पुरुष दुष्ट सती बरोबर रहात असेल . दुष्ट
पुरुष देवातेबरोबर रहात असेल. सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर रहात असेल आणि
कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्री बरोबर रहात असेल'' या चार
प्रकारच्या पती पत्नीच्या संबंधांमध्ये जीवनाचे वस्तुनिस्थ चित्रण आहे .
भगवान
बुद्धाचे मित्र आणि चाहते या प्रकरणात ''धनंजनी ब्राम्हनिची भक्ती '' विषद
केली आहे ...धनंजनी केवळ भगवंताची भक्त राहिली नाही तर तिने आपल्या
पतीलाही भगवान बुद्धाचा भक्त बनविले.
''विशाखेची दृढ
श्रद्धा '' या प्रकरणात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकून विशाखेच्या सासर्याची
काय अवस्था झाली होती या संबंधी विवेचन केले आहे . विशाखेबद्दल
त्याला(सासर्याला) असीम कृद्न्यता वाटली . तो तिला मातेसमान माणू लागला.
आणि त्याच प्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला . ह्यानंतर तिला
''मिगारमाता'' असे साम्भोडण्यात येऊ लागले
बुद्धाची
स्त्री संबधीची मते अतिशय सुस्पष्ट होती .कुटुंबात मुलगी जन्मली तर
कुटुंबाने दुक्ख न मानता आनंद मानवा . स्त्री हि सात भंडारापैकि एक अत्यंत
मौल्यवान भंडार आहे अशी बुद्धाची भावना स्त्रीसंबंधी असताना तो स्त्री
द्वेष्टा होता ,असे म्हणणे तर्कदुष्ट आहे, याउलट बुद्ध म्हणतो .'' स्त्री
हि सर्वोत्र्कुष्ट देणगी आहे कारण तिची उपयुक्तता अमोल आहे आहे.तिच्यापासून
बोधिसत्व आणि चक्रवर्ती जन्म घेतात ''
या विश्लेषणातून लक्षात येईल कि, धम्मात स्त्रीचे स्थान अतिशय आदरणीय आहे …!
संदर्भ :- डॉ बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार , खंड -६
संपादक :- डॉ धनराज डाहाट
_____________________________________________
स्त्रियांचा दर्जा
बुद्धाच्या धर्ममार्गात स्त्रियांचा दर्जा पुरुषाएवढा होता, हे सीमा भिक्षुणीच्या माराबरोबर झालेल्या खालील संवादावरून दिसून येईल.
दुपारच्या प्रहरी सीमा भिक्षुणी श्रावस्तीजवळच्या अंधवनात ध्यान करण्यासाठी बसली, तेव्हा मार तिजपाशी येऊन म्हणाला,
यन्तं इसीहि पत्तब्बं ठानं दुरभिसंभवं।
न तं द्वंगुलपञ्ञाय सक्का पप्पोतुमित्थिया।।‘जे
(निर्वाण) स्थान ऋषींना मिळणे कठीण, ते (भात शिजला असता तपासून पाहण्याची)
दोन बोटांची जिची प्रज्ञा, त्या स्त्रीला मिळणे शक्य नाही.’ सोम भिक्षुणी
म्हणाली,
इत्थिबावो कि कयिरा चित्तम्हि समुमाहिते।
आणम्हि वत्तमानम्हि सम्मा धम्मं विपस्सतो।।
यस्स नून सिया एवं इत्थाहं पुरिसो ति वा।
किञ्चि वा पन अस्मीति तं मारो वततुमरहति।।*‘चित्त
उत्तम प्रकारे समाधान पावले असता आणि ज्ञानलाभ झाला असता सम्यकपणे धर्म
जाणणार्या व्यक्तीला (निर्वाण मार्गात) स्त्रीत्व कसे आड येणार? ज्या
कोणाला मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, किंवा मी कोणी तरी हे, असा अहंकार+
असेल, त्याला माराने या गोष्टी सांगाव्या!’
आपणाला सोमा भिक्षुणीने ओळखले, असे जाणून मार दु:खित अन्त:करणाने तेथेच अन्तर्धान पावला.
हा संवाद काव्यमय आहे. तथापि, त्यावरून बौद्ध संघात स्त्रियांचा दर्जा कसा असे, हे स्पष्ट होते.
धर्मानंद कोसंबी
______________________________________________________
सौजन्य बहुजन ऑल इंडिया ते आपल मत मांडताना लिहितात :-
'
बौद्ध साहित्यातील आदर्श स्त्री रत्ने' या शंभर पानांच्या पुस्तकाच्या
वाचनानंतर बौद्ध कालीन स्त्रियांच्या विद्वत्तेबद्दल आणि शुभ आचारणा
बद्दलच्या अनेक गोष्टी ध्यानात येतात. स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भात
गौतम बुद्धावर आरोप करणाऱ्या लोकसाठी हे पुस्तक चांगले उत्तर आहे. हे
पुस्तक ११ ऑक्टोबर १९७८ रोजी प्रसिद्ध झाले आणि दुमीर्ळसुद्धा बनले.
हे
पुस्तक रमण पाटील या लेखकाचे होते आणि कदाचित त्याचे हे एकमेव पुस्तक
असावे , हे पुस्तक माझ्या वाचना मध्ये आले आहे म्हणून येथे हा उल्लेख करत
आहे,
आज पर्यंत आपल्या भारतीय
स्त्रियान समोर फक्त सीता, सावित्री, पार्वती, लक्ष्मी आणि पाच नवरे असणारी
द्रौपदी आणि दुसऱ्या पुरुषां पासून सहा मुले झालेल्या कुंती यांचाच आदर्श
आहे आहे , आणि या सगळ्या स्त्रिया चमत्कार आणि खोलात शिरले तरी मनाला न
पटणाऱ्या कथांवर आधारलेल्या आहेत ,
या पुस्तकात चोवीस स्त्रियांबद्दल लिहिले आहे.
मायादेवी,
महाप्रजापती गौतमी, यशोधरा, सुजाता, आम्रपाली, किसा गौतमी वासवदत्ता,
संघमित्रा अशा ओळखीच्या स्त्रिया इथे आहेत; तसंच महाप्रज्ञावती खेमा,
मिगारमाता विशाखा, धनंजनी, कुवलया, भदा कपिलायनी, उत्पलवर्णा अशा अनोळखीही
आहेत ज्यांचा बौद्ध धर्मावर स्त्री असून प्रभाव जास्त आहे.
या
मध्ये स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा लेखकाने अश्या प्रकारे केला आहे की
त्या स्तीयांच्या विद्वत्ते बद्दल आपली छाती भरून येते, या मध्ये आई चे
देहावसान झाल्या वर लहान सिद्धार्थ चे प्रेमाने संगोपन करणाऱ्या त्याच्या
गौतमी मावशीच्या मनाची उकल आहे जे नाव लहान सिद्धार्थ ने नंतर गौत्तम हे
नाव धारण केले ते त्या मावशीचा गौरव म्हणून, गौतमाच्या गृहत्यागाने अस्वस्थ
झालेल्या यशोधरेच्या मनाची अवस्था या पुस्तकात वेधली आहे , गौतमाने
विरक्ती घेतल्या वर यशोधरा मातेने सुद्धा आपल्या पतीच्या पावलावर पावूल
ठेवून रक्त वर्णी वस्त्र धारण करून दिवसातून एकवेळ भोजन करण्याचे सत्र
आयुष्या भर आचरणात आणले , महान मौर्य सम्राट अशोक यांच्या सांगण्या
वरून बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी ऐश्वार्य संपन्न जीवन त्यागणारी त्यांची
याची मुलगी संघमित्रा हिच्या बद्दल ,गृहिणीनं कसं वागावं हे सांगणारी
मिगारमाता विशाखा अश्या २४ स्त्रियान च्या विद्वत्ते बद्दल माहिती दिली आहे
.
"या स्त्रियांच्या
विद्वत्तेबद्दल वाचले तर वैदिक काळातल्या स्त्रिया आणी बौद्ध कालीन
स्त्रिया यांच्या मधील फरक स्पष्ट दिसतो कि कोठे त्या चमत्काराने युक्त
मनाला ना पटणाऱ्या स्तीया आणी कोठे जगाला आपल्या उत्तम आचरणातून उत्तम
मार्गावर आणणाऱ्या बौद्ध कालीन स्त्रिया, कदाचित ब्राम्हण समाजाने हे
पुस्तक वाचले तर त्याच्याही मनात हाच विचार यावा.
प्रशांत मा. गायकवाड
No comments:
Post a Comment