Tuesday, March 06, 2012

ಮರಾಠಿ ಕವಿತೆ : आयुष्यात बरीच माणसं

Rajshekar Chittawadgi
आयुष्यात बरीच माणसं येतात,
काही खूप जवळ येतात, समजून घेतात, नंतर
दूर जातात,
आपल्...यात काय वाईट आहे ते ओरडून
सांगतात, दोष देतात..
दोष देतात त्यात काहीच वाईट नाही.
दोष दाखवतं तेच खरं आपलं माणूस...
पण दोष देऊन दूर झाली तर मात्र
अशी माणसं जवळ न आलेलीच बरी..
कारण अशी माणसं जो काही दोष देऊन
जातात
तो दोष नेहमी कानात गरम रस
ओतल्यासारखा झोंबत राहतो....
माणसाने कुणाच्या हि आयुष्यातून
जाताना मागे फुलं सोडून जावं
आणि
काटे स्वतःसोबत घेऊन जावेत..
कारण...
मागे राहिलेला फुलांसोबत जगू शकतो,
पण शब्दांचे काटे क्षणाक्षणाने
आणि कणा कणाने मारतात.

No comments:

Post a Comment

ದಾಸಿಮಯ್ಯನ ವಚನ

ಒಡಲುಗೊಂಡವ ಹಸಿವ;  ಒಡಲುಗೊಂಡವ ಹುಸಿವ  ಒಡಲುಗೊಂಡವನೆಂದು  ನೀನೆನ್ನ ಜರಿದೊಮ್ಮೆ ನುಡಿಯದಿರ ನೀನೆನ್ನಂತೆ ಒಮ್ಮೆ ಒಡಲುಗೊಂಡು ನೋಡ ರಾಮನಾಥ.